लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवार यांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले….

Published on -

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल.

राज्यात करोना चाचण्यांमध्ये आणखी वाढ करावी लागेल,’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर आपलं मत मांडलं आहे.

‘देशांत सर्वाधिक टेस्ट महाराष्ट्रात होत असल्या तरी येत्या काळात त्यात वाढ करावी लागेल.

आरोग्याच्या काळजीसोबतच अर्थकारणाचाही विचार करून दोन्हींचा सुवर्णमध्य साधावा लागेल.

शिवाय ५५ वर्षांपुढील नागरिक, गर्भवती, लहान मुलं व आजारी व्यक्ती यांना गर्दीपासून दूर ठेवावं लागेल,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe