येत्या वर्षात या ठिकाणच्या नागरिकांना मिळणार शुद्ध पाणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-पुणतांबा रास्तापूर गावासाठी मंजूर असलेल्या पुरक पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून योजनेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आधिकार्‍यांचे पूर्ण लक्ष आहे.

तसेच या योजनेचे काम उच्च दर्जाचे असणार आहे, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच कामाबाबत काही आक्षेप असल्यास अधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आयोजन केले जाते.

तसेच वेळप्रसंगी ग्रामसभेचे आयोजन करून निर्णय घेतले जात असल्यामुळे सध्या तरी पाणी पुरवठा योजनेचे काम योग्य प्रकारे होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.

दरम्यान या पाणीपुरवठा योजनेसाठी साठवण तलाव, साठवण तलाव ते जलशुध्दीकरण केंदापर्यंतची पाईपलाईन, 25 मीटर उंचीची मुख्य संतुलन टाकी,

शुद्ध पाणी गुरुत्वनलिका, स्वामी समर्थ मंदिर अशोक बाबा आश्रमाजवळ यासह इतर ठिकाणी असलेल्या उंच टाक्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेसाठी असलेली पाईपलाईनसह अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. येणार्‍या 2021 मध्ये पुणतांबा ग्रामस्थांना पूरक पाणीपुरवठा योजनेमार्फत शुध्द पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment