अहमदनगरमध्ये कोरोना सावट गडद : शहर संकटात असताना महापौर अडकले प्रभागात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- संपूर्ण नगर शहरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे परंतु शहराचे महापौर मात्र प्रभागातच गुंतलेले आहेत. ते केवळ प्रभागापुरते माहिती घेऊन घरातच बसतायेत.

त्यामुळे ते शहराचे महापौर आहेत की प्रभागाचे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलत नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली.

महापौर बाबासाहेब वाकळे हे प्रभाग क्रमांक सहाचे नेतृत्व करतात. त्यांनी गुरुवारी त्यांच्या प्रभागातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. परंतु इतर प्रभागांतील परिस्थिती काय आहे याचा आढावा महापौर या नात्याने त्यांनी घेतला पाहिजे होता.

परंतु वाकळे हे आपल्याच प्रभागातील कामे मार्गी लावण्यात व्यस्त असतात, अशी त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरात इतर अनेक समस्या आहेत.

बहुचर्चित सिद्धीबागेसमोरील गटारीचा प्रश्न, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, बाहेरील जिल्ह्यांतून येणारे नागरिक , अन्नधान्य वाटप असे अगणित प्रश्न आहेत. परंतु त्यांना याकडे पहायला मात्र वेळ मिळेनासा झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment