अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान अकोले तालुक्यात आज (बुधवार ता.7) कोरोना विषाणूंनी सत्तरवर्षीय वृद्धाचा बळी घेतल्याने बळींचा आकडा पंचवीस झाला आहे. तर बाधितांचा आकडा सतराशे पार गेला आहे.

आज सकाळीच अकोले तालुकावासियांना कोरोना विषाणूंनी धक्का देत देवठाण येथील 70 वर्षीय वृध्दाचा बळी घेतला आहे. तर मंगळवारी मवेशी येथील 82 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला होता.
लागोपाठ दोन दिवस दोघा वृद्धांचा मृत्यू झाल्याने अकोले तालुकावासियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संख्येतही रोज नव्याने भरत पडत असल्याने सद्यस्थितीत बाधितांच्या संख्येने सतराशेचा टप्पा ओलांडला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved