अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील भाजप पक्षाला ग्रहण लागले आहे. भाजपातून राष्ट्रवादीत जाण्याचा धडाकाच सध्या सुरु आहे. नुकताच कर्जत तालुक्यातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
माजी उपसभापती व भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ कांताबाई नेटके यांचे सह सौ नीता भाऊसाहेब पिसाळ यांनी आज सौ सुनंदाताई पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत भाजपाला पुन्हा धक्का दिला.

कर्जत तालुक्यातील गायकरवाडी व बर्गेवाडी येथे झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत महिला सुसंवाद कार्यक्रमात आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांनी महिलांबरोबर चर्चा केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब नेटके यांनी केले. पंचायत समितीत एकमेव सदस्य असताना उपसभापती पदाला गवसणी घालून चमत्कार घडविणाऱ्या व
सध्या भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा असलेल्या सौ कांताबाई बापूसाहेब नेटके यांनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना बापूसाहेब नेटके यांनी सांगितले की आमदार रोहित पवार यांचे विकासाबद्दलच्या विचाराने प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज आपल्या पत्नीनेही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेतला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved