ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासुन प्रलंबीत आहेत.

त्याची पुर्तता होत नाही याचे निषेधार्थ कर्मचार्‍यांनी सोमवार दि. 9-11-2020 पासुन बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असुन,

याचवेळी पंचायत समिती अकोले समोर धरणे आंदोलन देखील करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, शाखा अकोले चे अध्यक्ष संदिप घोडके व सचिव संतोष नाईकवाडी यांनी दिली.

याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असुन, त्याच्या प्रती आ. डॉ. किरण लहामटे, उर्मिला जाधव, सभापती, पं.स., अकोले, तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आल्या आहेत.

तालुकाध्यक्ष श्री. घोडके म्हणाले की कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगालाच वेढले होते. या काळात सर्वसामान्य व्यक्ति जरी लॉकडाऊन च्या काळात घरात बसुन होते.

तरी आम्हाला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तसे शासनाचे आदेश देखील होते. व याकाळात आम्ही सर्व कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता काम केले असे

असतांना देखील आमच्या प्रलंबीत मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून ऐन दिवाळीच्या तोंडावर आमचेवर उपासमारीची वेळ आल्यामुळेच आमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे.

तालुका सचिव श्री. नाईकवाडी म्हणाले की आमच्या विविध मागण्या प्रलंबीत आहेत. त्यात प्रामुख्याने किमान वेतनातील फरक मिळावा, ऑनलाईन वेतनातील उर्वरित 25 व 50 टक्के ग्रामपंचायतने अदा करावे,

2007 पासुनचा रहाणीमान भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधीचा प्रश्‍न मार्गी लावावा, भविष्य निर्वाह निधीतील 8.33 टक्के रक्कम ग्रामपंचायतने कर्मचार्‍यांच्या खात्यावर वर्ग करावी.

विमा कवच मिळावे, सानुग्रह अनुदान/बोनस 2 मासिक वेतनाप्रमाणे अदा करण्यात यावा, कर्मचार्‍यांना वर्षातुन 2 वेळा ड्रेस मिळावेत, सेवा पुस्तक अद्ययावत करावे, प्रवास भत्ता मिळावा या व इतर मागण्या प्रलंबीत आहेत.

सदर बेमुदत काम बंद आंदोलन व धरणे आंदोलनात अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे,

राज्य सचिव दिलीपराव डिके तसेच अकोले तालुका उपाध्यक्ष दौलत नवले, कार्याध्यक्ष रोहिदास वैष्णव, उप-कार्याध्यक्ष संदिप वैद्य यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment