भारतीय क्रिकेट खेळाडू मोहम्मद सिराज रडला; त्यामागे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- आपण आज बघतो देशासाठी खेळत असताना अनेक खेळाडूंच्या डोळ्यातून पाणी येत असत आणि तसच काही तरी आता झालाय. मोहमद सिराज राष्ट्रगीत चालू असताना रडत होता.

त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याचा संघर्षाची जणू कहाणीच सांगत होते.मोहम्मद सिराजने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीत चांगले यश मिळवले आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर चा संघर्ष हा परीक्षा पाहणारा असतो. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सामन्यांची सुरुवात राष्ट्रगीताने होत असते.

पण हे मोहमद सिराज साठी नवीनच होते. त्यानं कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलं,त्याच्या डोक्या वर भारताची टेस्ट कॅप आली आणि तो पूर्ण भारावून गेला. सिडनी क्रिकेट ग्राउंड भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामान्य दरम्यान राष्ट्रगीत सुरु झालं आणि मोहमद सिराज ला अश्रू अनावर झालं. डोळे पुसत असतानाचा विडिओ बराच व्हायरल झाला.