मुंबई सध्या केंद्र सरकार रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. याच्या पाठोपाठ आता देशांतर्गत विमानसेवा सुरू केल्यास काय होऊ शकते याचा विचार केंद्र करत आहे.
केंद्राकडून हिरवा कंदील मिळताच १७ मेनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज रहा, अशी सूचना डीजीसीएने प्रमुख विमानतळ तसेच विमानसेवा कंपन्यांना दिल्या आहेत.
* येथे होईल विमानसेवा सुरु विमानतळावरील सूत्रांनुसार, डीजीसीए व बीसीएएसच्या चमूने विमानतळाला भेट दिल्यानंतर संबंधितांशी चर्चा केली. त्यामध्ये काही सूचना देण्यात आल्या.
पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु अशा महत्त्वाच्या विमानतळांवरून ही सेवा सुरू होईल. महानगरे व अ श्रेणीतील शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल.
तर द्वितीय श्रेणी शहरे दोन तासांच्या उड्डाण अंतरावर असले, तरच त्यासाठी विमानसेवा असेल. * असे असतील नियम ८० वर्षांवरील वरील प्रवाशांना बंदी,
केबिन सामानाला (सोबत बाळगण्याची पर्स अथवा बॅग) बंदी, विमान प्रवास शक्यतो दोन तासांपेक्षा कमी अंतराचाच असावा, विमानात अल्पोपाहार दिला जाणार नाही,
लक्षणे दिसताच विमानतळात प्रवेश नाही,मास्क घालणे व सॅनिटायझर बाळगणे अत्यावश्यक,विमानतळावर सुरक्षित वावर अनिवार्य,विमानतळावर जागोजागी सॅनिटायझरची सोय अनिवार्य.