धनंजय मुंडेबद्दल इंदुरीकर महाराज म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे हे मंदिरात गेले होते.

तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. यावेळी धनंजय मुंडेना देखील इंदुरीकर महाराजांचे किर्तन एकण्याचा मोह आवरता आला नाही.

धनंजय मुंडे श्रोत्यांच्या गर्दीत जाऊन इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकत बसले. यावेळी बोलताना धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

तसेच, संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News