सोने खरे कि खोटे? या बँकेकडून दागिन्यांची होतेय पडताळणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणी गहाण सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू आहे.

सोनगाव शाखेत सोनेतारण केलेल्या 191 कर्जदारांच्या सुमारे तीन कोटी रुपये कर्जाच्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासणी सुरू झाली आहे.

सराफ व कर्जदारांनी हातमिळवणी करून बनावट दागिने गहाण ठेवल्याचा संशय आहे. मंगळवारपर्यंत (ता.10) पोलीस बंदोबस्तात बँकेचे व सहकार खात्याचे अधिकारी,

कर्जदार व पंचांसमक्ष सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू राहणार आहे. त्यासाठी कर्जदारांना वकिलांतर्फे नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे बनावट सोने ठेवलेल्या काही कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

राहुरी येथे जिल्हा बँकेच्या विकास अधिकारी कार्यालयात सात वेगवेगळ्या तारखांना कर्जदारांना त्यांच्या सोन्याच्या पडताळणीसाठी बोलविण्यात आले आहे.

सोने खरे निघाले. तर, कर्जाची व्याजासह रक्कम भरून किंवा सोन्याचा लिलाव करून, कर्ज वसुली केली जाणार आहे. बनावट सोने निघाल्यास, सोनगाव शाखेचे सराफ व कर्जदार यांच्यावर फौजदरी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

सोने पडताळणीच्या दिलेल्या तारखेला कर्जदार गैरहजर राहिल्यास, त्यांच्या अपरोक्ष पंचांसमक्ष सोन्याची पडताळणी केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe