…असे घडले हुंडेकरी यांचे अपहरण थरारनाट्य ….

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांचे आज भल्या पहाटे अज्ञात चार ते पाच जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे नगरसह जिल्ह्यात खळबळ उडाली.या अपहरणाचे थरारनाट्य एखाद्या चित्रपटासारखेच होते.

नगर येथील ६४ वर्षाचे हाजी करीमभाई हुंडेकरी हे मोठे उद्योजक, व्यावसायिक असून हुंडेकरी लॉन्स, टाटा शोरुम तसेच सिमेंट, हॉटेल असे मोठे उद्योग हुंडेकरी यांचे आहेत.

आज सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ६ वाजता सर्जेपुरा येथील मशिदीमध्ये नमाजसाठी हंडेकरी हे गेले होते. नमाज झाल्यानंतर ते बाहेर पडले . त्यानंतर थोड्याच वेळात चार ते पाच जणांच्या टोळक्याने हुंडेकरी यांना घेरले,
त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एका गाडीत बसविले यावेळी हुंडेकरी यांनी या टोळक्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

 

अपहरणकत्यांनी बळाचा वापर करत हंडेकरी यांना गाडीत बसविले, चार ते पाच संख्येने असणाऱ्या अपहरणकत्यांनी तोंडाला स्कार्प बांधलेले होते,असे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी पाहिलेल्या महिलांनी सांगितले.

अपहरणकर्ते यांनी हुंडेकरी यांना गाडीत घेवून फरार झाले. इकडे हुंडेकरी यांच्या घरचे लोक त्यांची वाट पहात होते . कदाचित हंडेकरी हे नेहमीप्रमाणे नमाजवरुन येताना मॉनिंग वाकला गेले असावेत म्हणून वेळ लागला असावा असे त्यांच्या घरच्यांना वाटले,

परंतु साडे आठ वाजून गेले तरी हुंडेकरी हे घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला असता त्यांचे अपहरण झाल्याची माहिती घटनास्थळी असणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शनी सांगितली. दुपारी २ वाजता जालना जिल्ह्यात त्यांचे लोकेशन आढळले,

अपहरणकर्त्यांची माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अपहरण झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली.

 

दरम्यान हुंडेकरी यांना पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद-जालना रोडवरुन सुखरुपपणे ताब्यात घेतले असून उद्योजक हुंडेकरी यांना सव्वातीन वाजता नगरमध्ये आणण्यात आले आहे.

काही तासामध्येच पोलिसांच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवून उद्योजक हुंडेकरी यांची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली.दरम्यान पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून यासंदर्भातील चौकशी चालू आहे.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/18/kidnapped-businessman-hundekari-was-released-within-hours/

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/18/news-businessman-hundekari-kidnapped-a-cinestyle/

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/18/krimbhai-hundekari-kidnap-news-story-ahmednagar-reached-by-bus-directly-from-jalna/