जिल्हयात कोरोना प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. लॉक डाऊनमध्ये अनेक गोष्टींवर निर्बंधाचे निर्देश जारी केले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी बुधवारी नव्याने आदेश जारी करीत दक्षतेसह काही क्षेत्र, सुविधांना मोकळीक दिली आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे.
पेट्रोल- डिझेलसंदर्भात निश्चित केलेली वेळ, त्याचप्रमाणे औषधे विक्रीबाबतचे नियम येत्या ३ मे पर्यंत लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमे (ब्रॉडकास्टींग, डीटीएच, केबल सेवा), कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसेस, खासगी सुरक्षा सेवा, इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर्सची दुरुस्ती, वर्कशॉप सुरू राहतील.
सामाजिक क्षेत्राशी संबंधित निराधार, अल्पवयीन मुलांची निवारागृहे, संजय गांधी, इंदिरा गांधी योजना, निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधी विषयक सेवा सुरू राहतील. अंगणवाडी सेविका दर पंधरा दिवसांला मुले व महिलांचा पोषण आहार घरपोच देतील. मत्स्यव्यवसाय संबंधित प्रक्रिया करणारे सर्व उद्योग, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी, विक्री, पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्म सुरू राहतील.
वनक्षेत्रातील कामांना परवानगी असणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व कामे सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून सुरू राहतील. पोस्टल, कुरिअर सेवा देणाऱ्या आस्थापना, इंटरनेट सेवा, पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरू राहतील.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना जवळच्या दुकानावर पायीच जावे लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या दुचाकी व खासगी वाहनांना परवानगी नाही. बांधकामासाठी महापालिका व नगरपालिका हद्दीतील कामे सुरू राहतील. मात्र, कोणत्याही नव्या बांधकामास परवानगी देण्यात आलेली नाही.
या आदेशानुसार तूर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव सुरू राहणार आहे. त्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांना प्रवेशाची मुभा राहील. लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करावी लागणार आहे.
हॅण्डवॉश, सॅनिटायर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची राहील. लिलावाच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. खते, किटकनाशके व बी-बीयाणे यांची दुकाने सुरू राहतील. पीक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणाऱ्या यंत्रांच्या वाहतुकीला परवानगी असणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®