पवार साहेबांच्या कृपेमुळेच अधिग्रहण होणाऱ्या जमिनी बचावल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- के के रेंजच्या विस्तारासाठी जिल्ह्यातील उत्तरेकडील अनेक जमिनी अधिग्रहण केल्या जाणार होत्या. पुन्हा विस्थापित होण्याच्या भीतीने येथील गावकऱ्यांनी या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे साकडे घातले होते.

पवार साहेबांनी या विषयात लक्ष घालत तात्काळ संरक्षण मंत्र्यांची भेट घेत हा विषय मार्गी लावला. शरद पवार व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी तासभर झालेली चर्चा सत्कारणी लागली.

चार दिवसापूर्वी नगर येथे कर्नल जी. आर. कानन यांनी “भूमी अधिग्रहण केले जाणार नाही.” असे जाहीर केले. खासदार पवार यांच्या मध्यस्थीनंतर संरक्षण खात्याने जनतेला दिलासा दिला.

त्यामुळे, राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील 23 गावांची टांगती तलवार दूर झाली आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आज (सोमवारी) राहुरी तहसील कार्यालयात बोलतांना मंत्री तनपुरे म्हणाले, “नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनीही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासमवेत के. के. रेंज प्रश्नी चर्चा केली. खासदार शरद पवार यांच्या बैठकीप्रसंगी मी कोविड पॉझिटिव्ह असल्याने उपस्थित राहू शकलो नाही.

परंतु, माझे सहकारी आमदार नीलेश लंके त्यांच्या सहकार्‍यांसह उपस्थित होते. 2021 मध्ये युद्ध सरावाच्या दृष्टीने अधिसूचना निघाली. तरी, ग्रामस्थांनी घाबरण्याचे कारण नाही. खासदार पवार यांची शिष्टाई सफल झाली. त्यांचे जनतेतर्फे आभारी आहे.” असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment