वर्ष वाया गेले तरी चालेल..पण मुलांना शाळेत पाठवणार नाही !

Published on -

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरु केल्या आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाईक अंतर राखणे जमले नाही, तर संकट ओढवेल, अशी भीती पालकांना आहे.

शिवाय पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही पालकांना वाटत आहे. म्हणून कोरोनाचा धोका कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे काही पालकांना वाटत आहे.

सध्या जसे ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले जात आहे, तसेच अध्यापन सोशल माध्यमांचा वापर करून करावे, अशी मागणी काही पालकांमधून होत आहे.

तर, कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात १५ जूनलाच शाळा सुरू कराव्यात, अशी काही पालकांची मागणी आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अजून चिंतेत आहे.

मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शाळेत पाठवणार नाही, अशी काही पालकांची भूमिका आहे.

तर काही पालक शाळा सुरू करा, अशी मागणी करत आहेत. तूर्तास शाळा व्यवस्थापन समित्यांचे सर्व अभिप्राय आणि शासनाचे स्पष्ट आदेश आल्यावरच शाळा सुरू होतील, असे दिसून येत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe