पिचड म्हणतात, ”ती’ मोहीम म्हणजे सरकारचे जबाबदारी टाळण्याचे काम’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम आखली आहे. परंतु आता या मोहिमेवरूनच माजी आमदार वैभव पिचड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पिचड म्हणाले की, ही मोहीम म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे कोरोना ही आमची जबाबदारी राहिली नसल्याचे सांगितले आहे.

तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा, अशी कदाचित सरकारी भूमिका असावी,’ अशी टीका त्यांनी केली. वैभव पिचड नगरमध्ये आले असता त्यांनी हि टीका केली.

ते पुढे म्हणाले. कोरोना जेव्हा सुरू झाला, तेव्हा सर्वात प्रथम त्याची जबाबदारी ग्रामीण भागात गावातील सरपंच म्हणजेच कोरोना समितीवर टाकण्यात आली. या समितीसाठी मात्र राज्य सरकारने एकही रुपयांची तरतूद केली नाही.

जो काही खर्च झाला, तो ग्रामपंचायतींना स्वतःच्या उत्पनातून करावा लागला. तसेच आता जी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू झाली,

त्यात सुद्धा सरकारने सांगितले आहे की ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी दोन कर्मचारी नियुक्त करून त्यांचा हजार-हजार रुपये पगार हा ग्रामपंचायतीने द्यावा.

पण या सर्वेक्षण कामासाठी ग्रामपंचायतीने उत्पन्न आणायचे कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अकोले तालुक्याच्या आरोग्याच्या बाबतीत प्रशासन, पालकमंत्री यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहे.

तसे तर नगर जिल्हा राज्याच्या मध्यभागी आहे. या जिल्ह्यात एकमेव आदिवासी तालुका आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या भागांत विशेषत: गडचिरोली सारख्या जिल्ह्यात काय अवस्था होत असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment