लागिरं झालं जी’ फेम कमल ठोके काळाच्या पडद्याआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- ‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे ऐन दिवाळीत दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अशा जाण्याने त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमल ठोके या मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या पेशाने शिक्षिका होत्या.

ते सांभाळत त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News