जामखेड :- तालुक्यातील २१ छावणीचालक संस्थांना सहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.
त्यामुळे सर्वच छावणीचालकांचे धाबे दणाणले आहे. यातील अनेक छावण्या पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत.
तालुक्यात पन्नास छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पंचेचाळीस सुरू झाल्या आहेत. ५ एप्रिलला पाच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

शासनाने छावणी चालकांवर अनेक अटी घातल्या आहेत. तथापि, छावणी चालकांनी त्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यात आली.
छावण्यांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. जनावरांचे आवक-जावक रजिस्टर अद्ययावत नसणे, छावणीतून जनावरे घेऊन गेलेल्या व्यक्तीचा अर्ज नसणे,
पुरवठा होणारा चारा व पशुखाद्याची नोंद नसणे, हिशेब न जुळणे, पंचनामा न करणे, सुविधा फलक न लावणे, जनावरांना बिल्ले न लावणे, खर्चाच्या नोंदी नसणे, नकाशाप्रमाणे छावणीची रचना नसणे,
छावणीत सीसीटीव्ही नसणे, पुरेसा विद्युत पुरवठा नसणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, प्रतिजनावराप्रमाणे खाद्य न देणे, कडबाकुट्टी करून चारा न देणे,
शासकीय अनुदानाचा हिशेब न ठेवणे, आजारी जनावरांची वेगळी व्यवस्था न करणे, जनावरांची निवारा व्यवस्था न करणे अशा एकवीस निकषांची अंमलबजावणी छावणी चालकांनी केली नसल्याचे आढळले.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही