जामखेड :- तालुक्यातील राजेवाडी परिसरात माहेरी निघालेल्या विवाहितेचा चालत्या रिक्षातच चालकाने विनयभंग केला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने चालत्या रिक्षातूनच बाहेर उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रिक्षातून उडी मारल्याने पिडीत महिला जखमी झाली आहे.
दरम्यान या घटने नंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करीत आरोपीला चोवीस तासांच्या आत गजांआड केले.
बाळु भारत आजबे असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित विवाहिता पुणे येथून आपल्या माहेरी राजेवाडी येथे निघाली होती.
सोमवारी रात्री आठ वाजता सदर महिला जामखेड येथून राजेवाडीकडे जाण्यासाठी जुन्या बसस्थानकात नान्नज गावाकडे जाणाऱ्या एसटीची वाट बघत होती.
बाळु भारत आजबे (रा. सारोळा, ता. जामखेड) हा रिक्षा घेऊन त्या ठिकाणी आला. या वेळी एसटी बसला उशीर होत असल्याने बसची वाट पाहणाऱ्या काही महिला रिक्षात बसल्या.
त्यांच्यासोबत सदर विवाहिताही त्या रिक्षात बसली. नान्नजकडे जात असताना इतर प्रवासी महिला झिक्री गावात उतरल्या.
सदर विवाहिता रिक्षात एकटीच असल्याचे पाहून राजेवाडी शिवारात चालक बाळु आजबे याने सदर महिलेशी लगट करून विनयभंग केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या विवाहितेने जिवाची पर्वा न करता चालत्या रिक्षातून उडी मारली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
या वेळी महिलेने रिक्षातून उडी मारल्याचे पाहून रिक्षाचालक घटनास्थळावरून पसार झाला.
त्याचवेळी सदर महिलेने जवळ असणाऱ्या घराकडे धाव घेत मदत मागितली व नातेवाईकांशी संपर्क साधला.
नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विवाहितेला जामखेड येथे आणून उपचार केले.
- PGCIL Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, जीआर पण निघाला
- व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये सुधारणा ! स्टॉक Hold करावा, SELL करावा की BUY ? तज्ज्ञांनी स्पष्टचं सांगितलं
- Tata ग्रुपचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 95% रिटर्न मिळणार
- Post Office च्या टाईम डिपॉझिट योजनेत चार लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? पहा…