दहा हजार रुपयांसाठी तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Published on -

जळगाव :- लायटिंगच्या व्यवसायातून ३५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये बाकी असल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये वाद झाले.

त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांनी तरुणाच्या घरी जाऊन बाहेर बोलावले. काही अंतरावर नेऊन त्याला बेदम मारहाण केली.

दोघांनी पाच वेळा वीस किलो वजनाचा दगड तरुणाच्या डोक्यात घालून हत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री ईश्वर कॉलनीत घडली. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे.

घनश्याम शांताराम दीक्षित (वय ३७, रा. ईश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सनी उर्फ चालीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) व मोहिनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेलच्या मागे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe