‘जायकवाडी’चे बारा दरवाजे उघडले

Ahmednagarlive24
Published:

पैठण : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरण प्रशासनाने रविवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता धरणाचे चार दरवाजे व त्यानंतर रात्री ११.३० वाजता आणखी ८ असे एकूण १२ दरवाजे अध्र्या फुटाने वर उचलून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

सध्या धरणात १७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी धरणाची पाणीपातळी ९२ टक्के झाली असता धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यांनतर आज (दि. १५ सप्टेंबर) रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरताच जायकवाडी प्रशासनाने धरणाचे बारा दरवाजे अध्र्या फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment