जायकवाडी धरण ‘इतके’ भरले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरधार सुरु आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे.

काल सोमवारी दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे.

गंगापूरच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. असे असले तरी गंगापूर धरण 82 टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे! दारणातून काल सकाळी 6 वाजता 11550 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

तर खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 14234 क्युसेकने विसर्ग सुरु होता. दरम्यान जायकवाडीचा उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजता 65.95 टक्के इतका झाला होता !

काल उशीरा पर्यंत गोदावरीतील विसर्ग 14234 क्युसेकवर स्थिर होता. काल सकाळी 6 पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत आतापर्यंत 1 लाख 13 हजार 145 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला.

हे पाणी पावणेदहा टीएमसी (9779 दलघफू) इतके आहे. त्यामुळे गोदापात्रातील जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा वेग वाढत आहे. जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 65.95 टक्के इतका झाला होता.

यात उपयुक्तसाठा 50.57 टीएमसी इतका तर मृतसह एकूण साठा 76.64 टीएमसी इतका झाला होता. काल सहा वाजता या जलाशयात 22757 क्युसेकने पाण्याची आवक होत होती.

तर गोदावरीतुन वैजापूर तालुक्यातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ काल सायंकाळी 7 वाजता 13520 क्युसेकने पाण्याचा प्रवाह जायकवाडीच्या दिशेने सुरु होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment