अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला आहे. आता पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबत जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. २९ तारखेला आम्ही लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेऊ.
बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तिथेले व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले.
पण जिथे रुग्ण जास्त आहेत तिथे शिथिलता दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केलेल्या दाव्यांचा खुलासा केला.
जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले.
सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले. राज्यातील युवकांवर त्यांनी अविश्वास दाखवला.
मुख्यमंत्री निधीला एकही रुपया न देता इथे निधी देऊ नये असे आवाहन केले. त्यामुळे भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का ? असा प्रश्न उभा राहतोय. केंद्राने पीपीई आणि मास्क दिल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात १० दहा लाख पीपीई कीट, १६ लाख मास्क दिल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख १३ हजार ५०० एन९५ मास्क मागितले. पण ३० ट्क्के हून कमी आले.
पीपीई किट्स, व्हेंटीलेटर, इन्फ्यूजन पंप आले नाही. आम्ही करत असलेल्या प्रयत्नामध्ये भाजप कुठे दिसत नाही. फडवणवीसांनी विरोधकांची भूमिका सोडून सहाय्याची भूमिका घ्यायला हवी.
केंद्राने काही सूचना दिल्या आहेत पण आलेले पॅकेज परवडणारे नाही. कठीण प्रसंगात केंद्राकडून विशेष मदत मिळाली नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com