जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासोबत काही नराधमांनी अतिशय अमानवीय कृत्य केले आहे.

दिल्ली येथे उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आई-वडिलांच्या गैरहजेरीतच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही अतिशय घृणास्पद व मानवजातीला काळीमा फासणारी घटना असून

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहे. सरकार नावाच्या यंत्रणेचा गुंडांना कोणताही धाक राहिलेला नाही, हे दिसून येते. त्यामुळे खुलेआम असे प्रकार दिवसाढवळ्या घडत असून महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे.

आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने अमानवीय घटेनाचा जाहीर निषेध करत असून या प्रकरणातील आरोपींना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहे.

महिला ही कोणत्याही जाती धर्मातील असो, तिचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे. तिथे जातधर्म आजिबात आडवे येता कामा नये.

उत्तरप्रदेश सरकारने या घटनेकडे दुर्लक्ष न करता हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा,

अशी मागणी नायब तहसीलदार यांच्याकडे जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्षा अनिताताई कराळे, उत्तर जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई सावंत,

कांता बोठे, सुमेधा शेजूळ, मीनाक्षी वाघस्कर, शारदा पवार, मीनाक्षी जाधव, मंगल क्षीरसाट, आशा तुंगार, प्रिया गडाख, सुरेखा चोधरी,

शितल खेडकर, संगीता चौधीर, शारदा पोखरकर, कुंदा वामन, स्मिता कुटे, हेमा काळाणे, स्वाती रुपनर, सविता व्यवहारे, आशा गायकवाड, सीमा झेंडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe