जिओचा ग्राहकांना मोठा झटका, तुम्हीही जीओ वापरत असाल तर हे आजच वाचा !

Ahmednagarlive24
Published:

वृत्तसंस्था :-मोफत कॉलिंगचे आमिष दाखवून ग्राहकांना भुलवलेल्या रिलायन्स जिओने आता हळूहळू एकेक धक्का द्यायला सुरुवात केली आहे.

जिओने बाजारात दाखल होताच खळबळ निर्माण केली होती. तसेच काही कंपनीला जिओमुळे टाळे देखील लागले आहेत. महत्वाचे म्हणजे, स्वत दरात अनेक सुविधा भेटत असल्याने ग्राहकांनी जिओला पसंती दिली होती.

रिलायन्स जिओने त्यांच्या टॅरिफ शुल्कच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

मोबाईल सेवेच्या दरांमध्ये संशोधन करण्यासाठी ट्राय कंपन्यांसोबत सल्लामसलत करणार आहे. पण सध्यातरी ट्राय कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीची वाट बघणार आहे, असं ट्रायच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, जिओनं याआधी दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी आययूसी व्हाऊचर आणलं होतं, आता टॅरिफ शुल्कही वाढवण्यात आलं आहे.

जिओच्या या निर्णयाचा फटका असंख्य ग्राहकांना बसणार आहे.दर वाढवले तरी डेटा वापरावर याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा विश्वास जिओने वर्तवला आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment