अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि पोस्ट ऑफिसने बऱ्याच जागेवर भरती काढली आहे. चांगली गोष्ट म्हणजे या भरतींमध्ये निवड प्रक्रिया अगदी सोपी आहे.
पोस्ट ऑफिसविषयी सर्वप्रथम पाहूया – एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकेल. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. टपाल कार्यालयातील विविध पदांवर भरती गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची मुदत –
भारतीय टपाल खात्यामधील नोकऱ्यांसाठी अर्ज 21 डिसेंबर 2020 पासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी आहे. आपण टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एकूण 4269 पदांसाठी ही भरती केली जणार आहे.
अर्ज फी किती असेल ? –
पोस्ट ऑफिसमध्ये भरतीसाठी अर्ज फीदेखील आहे. सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस पुरुष अर्जदारांना फक्त 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी आणि महिला प्रवर्गासाठी कोणताही अर्ज फी ठेवलेला नाही.
एसबीआयमध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत ? –
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अभियंता पदासाठी भरती केली आहे. या पदांसाठीही परीक्षा होणार नाही, अर्जदारांची शॉर्टलिस्ट केली जाईल व त्यानंतर त्यांची मुलाखत घेतली जाईल. केवळ मुलाखतीच्या आधारे तुम्हाला एसबीआयमध्ये नोकरी मिळेल.
कोण अर्ज करू शकेल ? –
एसबीआयमध्ये अभियंता (फायर) पदांसाठी फक्त जास्तीत जास्त 40 वर्षांच्या व्यक्ती अर्ज करा. त्यासाठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे बीई (फायर) किंवा यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेचे बी टेक आवश्यक आहे. या पदांसाठी बँकेने एकूण 16 जागा काढल्या आहेत.
कोठे अर्ज करावा –
आपणास या पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास आपण या लिंकवर अर्ज करू शकता (https://recruitment.bank.sbi/crpd-sco-fire-2020-21-32/apply) . एसबीआयमध्ये या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी आहे.
अर्ज फी किती आहे ? –
जनरल, ईडब्ल्यूसी आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांना 750 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एससी, एसटी आणि दिव्यांगकडून कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved