अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.
पदवीधरांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. वसई विरार शहर महागनरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र शहर क्षयरोग कार्यालयासाठी खालील अस्थायी स्वरुपातील पदे करारपद्धतीने 11 महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात करारतत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
कोणत्या पदांवर संधी –
पदाचे नाव : क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता
पदांची संख्या : 3 प्रवर्ग : अ. जमाती – 2, खुला प्रवर्ग – 1
मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन 15500 रुपये
पदाचे नाव : जिल्हा पी. पी. एम. समन्वयक
पदांची संख्या : 1
प्रवर्ग : खुला – 1
मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन 20000 रुपये
पदाचे नाव : वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक
पदांची संख्या : 4
प्रवर्ग : अ. जमाती – 1, अ. जाती – 1, वि. जा/भ.ज.(ब) / भ.ज.(क)/ भ.ज.(ड)- 1, खुला प्रवर्ग -1
मानधन प्रति महिना : मासिक ठोक वेतन 20000 रुपये
अर्ज भरण्याची पद्धत :
महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन सदर अर्ज स्वाक्षरीसह भरुन त्यासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रति जोडणे आवश्यक आहे.
मुलाखत कोठे आणि कधी ? –
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी शुक्रवार दि. 22 pजानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता वसई-विरार शहर महानगरपालिका, पापडखिंड डॅम, फुलपाडा, विरार पूर्व येथे आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या मुळप्रती आणि साक्षांकित सत्यप्रती दोन पासपोर्ट साईज फोटोजसह विहित नमुन्यातील अर्जासह उपस्थित रहावे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved