कंगना राणावत हिच्या अडचणीत वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

आणि प्रकरणाची पुढील चौकशी गरजेची असल्याचे पोलिसांनी सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले. जावेद अख्तर यांनी या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात कंगनाविरोधात तक्रार नोंदवली होती.

तसेच तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने डिसेंबरमध्ये जुहू पोलिसांना या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले होते. जुहू पोलिसांनी सोमवारी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर चौकशीचा अहवाल सादर केला. त्यात कंगनाविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि प्रकरणाच्या पुढील चौकशीची गरज असल्याचे स्पष्ट केले.

महानगरदंडाधिकारी आर. आर. खान यांनी पोलिसांनी सादर केलेला अहवाल वाचल्यावर कंगनाला समन्स बजावत प्रकरणाची सुनावणी १ मार्चला ठेवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment