महाराष्ट्राच्या मदतीला धावला केरळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कोरोनाच्या लढ्यात केरळ सरकराने त्यांचे प्रशिक्षित डॉक्टर्स व नर्स पुरवावेत अशी मागणी ठाकरे सरकारने केली होती. त्यानुसार केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार होणार आहे

असल्याची माहिती थॉमस इसाक यांनी दिली. देशात सगळ्यात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर केरळने शर्थिचे प्रयत्न करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवलं.

त्यानंतर त्या पॅटर्नची चर्चा सर्व देशात झाली होती. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनीही केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत त्यांनी कलेले प्रयत्न जाणून घेतले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment