अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : किरण काळे यांची युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या नगर ग्रामीण व शहर जिल्हा समन्वयक पदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आदेशावरून व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाचे युवा नेते किरण काळे यांची अहमदनगर ग्रामीण आणि नगर शहर जिल्हा युवक काँग्रेस व एन.एस.यु.आयच्या “समन्वयक पदी” निवड करण्यात आली आहे.
संगमनेर येथील राजहंस दूध संघांमध्ये या निवडीचे पत्र महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते किरण काळे यांना देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एन.एस.यु.आयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, स्वप्नील पाठक आदी उपस्थित होते. किरण काळे हे अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक चळवळीत कायम अग्रभागी राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वेळा युवक प्रदेश उपाध्यक्ष आणि नगर युवक शहर जिल्हाध्यक्ष राहिलेल्या काळे यांनी मार्च महिन्यामध्ये महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून काळे यांच्यावर नेमकी काय जबाबदारी दिली जाणार याबाबत उत्सुकता होती.
काळे यांनी नगर शहरातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. ते उत्तम वक्ते आणि अत्यंत आक्रमक युवा नेता म्हणून नगर शहर आणि जिल्ह्याला परिचित आहेत. अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या काळे यांना राज्य पातळीवर युवक संघटना बांधणीचा गाढा अनुभव आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष ना.थोरात यांनी सोपवली आहे. ना.थोरात यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी काळे यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
किरण काळे यांच्या निवडीने अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या निवडीचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे ,आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाचे युवा नेते किरण काळे यांची अहमदनगर ग्रामीण आणि नगर शहर जिल्हा युवक काँग्रेस व एन.एस.यु.आयच्या “समन्वयक पदी” निवड झाल्याचे पत्र देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एन.एस.यु.आयचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, स्वप्नील पाठक आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews