जाणून घ्या महाविकास आघाडीबाबत शरद पवार अहमदनगर मध्ये काय म्हणाले ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता इतर राज्यातून सुद्धा या पॅटर्नबाबत विचारणा केली जात आहे. आज थेट सांगता येणार नाही पण हा प्रयोग निश्‍चितपणे पुढे जाऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच मंत्रिपदासाठी कोणीही नाराज नाही, असेही पवार म्हणाले.

हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !

शरद पवार नगर जिल्ह्यात आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, खातेवाटप सुद्धा आठ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले आहे, सर्व पक्षांकडे जे खाते निश्चित केलेले आहे त्यांना ते देण्यात येणार आहे, आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत खातेवाटप निश्चित पणे जाहीर होईल असे पवार यांनी सांगितले.

हे वाचा :- अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !

खातेवाटपाबाबत कोणताही वाद नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. “मी मंत्री असताना सुद्धा आम्ही शपथ घेतल्यानंतर एक-दोन दिवस खातेवाटप करण्यासाठी लागायचे व त्यानंतरच आपल्याला कुठले खाते मिळाले हे लक्षात येते असे.” आता हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, दोन दिवसाचा विलंब काही जास्त नाही, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मंत्रिपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर पक्षांमध्ये बर्‍याच ठिकाणी नाराजीचा सूर आहे, असे विचारल्यावर कोणत्याही पक्षामध्ये नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महा आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर संख्याबळ सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही.

हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही कुणी नाराज नाही उलट आमच्याकडे खाते नको म्हणणारेच आहेत. आम्ही गृहखातं द्या, असे म्हणालो त्या वेळेला ते माझ्याकडे नको असे सांगणारे सुद्धा आमच्याकडे आहेत अशी कोपरखळी सुद्धा पवार यांनी यावेळी लगावली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment