आता मिळणार सात दिवसांआड पाणी

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे.

तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने सात दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले.

पाणीप्रश्नातून कायमस्वरूपी सोडवणूक करायची असेल, तर २५ एकरांतील पाच नंबर तळ्याचे काम करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment