कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत !

Ahmednagarlive24
Published:

राहाता :- डोळ्यांसमोरून हक्काचे पाटपाणी वाहून जात आहे. कोपरगाव मतदारसंघातील विकास कामांचे प्रश्न तसेच पडून आहेत, असे प्रतिपादन माजी आ. अशोकराव काळे यांनी केले आहे.

राहाता तालुक्यातील चितळी येथे माजी आमदार काळे यांनी नुकतीच स्नेहभेट देऊन येथील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर वाघ होते. व्यासपीठावर माजी सरपंच शिवाजीराव वाघ, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी मान्यवर उपस्थित होते.

काळे यावेळी म्हणाले की, सध्याच्या आमदारांनी केवळ विकास कामांवर गप्पा मारल्या. हक्काचे पाटपाणी डोळ्यासमोरून वाहून जात असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.

शासनाच्या सोयीसवलती शेतकरी वर्गाला मिळत नाहीत हे दुर्दैव आहे. आशुतोष काळे यांची आजही शेतकऱ्यांना पाटपाणी टेलपर्यंत मिळण्यासाठीची न्यायालयीन लढाई चालू आहे. त्याला बळ देण्याचे काम तुमचे असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी त्यांनी केले.

युवा नेते दीपक वाघ यांनी सांगितले की, काळे हे आमदार असताना चितळी येथील केलेल्या लाखो रुपये कामांच्या विकासाचा लेखाजोखा सांगून दुष्काळात पाणी कसे मिळवून दिले याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच यावेळी बी. टी. तनपुरे, रेवनाथ वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य नारायणराव कदम, रुपेश गायकवाड, राजू वाणी, नितीन वाकचौरे, जालू तनपुरे, राजू माळी, सोपान वाघ, अरुण कातोरे, गणेश वाघ, विलास वाघ, बाबासाहेब वाघ, सुनील गायकवाड,

प्रकाश आरणे, राजू कुऱ्हाडे, बनसोडे, दिलीप वाघ, मच्छद्रिं वाघ, सूर्यकांत वाणी, बाळासाहेब माळी, सतिश गायकवाड, संदीप वाघ आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. आभार सामाजिक कार्यकर्ते राजू वाणी यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment