उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- आज पहाटे अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं. 

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते.

दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपहरण झालेल्या हुंडेकरी यांची सुखरुप सुटका झाल्याची माहिती सोमवारी दुपारी नगरला समजली. ज्या चार आरोपींना हुंडेकरी यांची अपहरण केले होते. त्यांनी हुंडेकरी यांना जालना येथे सोडून दिले होते.

त्यानंतर हुंडेकरी हे बसने नगरला येण्यासाठी बसले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या युवकाच्या मोबाईलवरुन घरी संपर्क केला होता.

त्यानंतर हुंडेकरी हे बसने नगरला येत असताना त्यांना पोलिसांनी जेऊन टोलनाक्यावर ताब्यात घेतले.

या अपहरणा बाबत कळाल्यानंतर  पोलिसांनी तत्काळ शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे करीमभाई जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तात्काळ चार पथके करून जालन्याच्या दिशेने रवाना केली. मात्र, अपहरणकर्त्यांनी करीमभाई यांना जालन्याच्या बसस्थानकावरच सोडून दिले आणि ते पसार झाले होते.

तेथून करीमभाई यांनी थेट एसटी बसमध्ये बसून नगरच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्या वेळी बसमध्ये शेजारी बसलेल्या तरुणाकडून मोबाईल घेऊन करीमभाईंनी आपल्या घरी फोन केला आणि एसटी बसने घरी येत असल्याचे सांगितले.

करीमभाई एसटी बसने नगरकडे येत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार आधीच जालन्याच्या दिशेने निघालेल्या पोलिस पथकाने नगर-औरंगाबाद रस्त्यावरील टोल नाक्‍यावर थांबून प्रत्येक एसटी बसची तपासणी करत होते

तेव्हाच दुपारी तीन च्या दरम्यान पुण्याला जाणाऱ्या एका बसमध्ये करीमभाई बसलेले आढळले. त्यांना उतरवून घेऊन पोलिसांच्या वाहनातून नगरला आणण्यात आले.

दरम्यान हुंडेकरी यांनी ज्या तरुणाच्या मोबाईलवरून घरी संपर्क साधला, त्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचा जबाब घेऊन सोडून दिले.या प्रकरणामागे नेमकं काय आहे याचा छडा आता पोलीस लावत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment