शेवया, वडे, वेफर्स, पापड्या, कुरडयांच्या निर्मितीसाठी महिलांची लगबग

Published on -

Maharashtra News : वाढत्या उन्हाच्या पाऱ्यात महिलांनी आपले लक्ष शेतीकामांऐवजी घरातील कामांकडे वळवले आहे. महिला सध्या घरात शेवया, कुरडया, पापड, मसाले करण्यास प्राधान्य देत आहेत.

दुपारच्या प्रहरी महिला एकत्र येऊन कुरडया तयार करण्यात मग्न असल्याचे चित्र सध्या गावखेड्यात पहावयास मिळत आहे. ग्रामीण महिला एक दुसऱ्याच्या कामांमध्ये सहभागी होऊन एकमेकींना मदत करत आहेत.

वाळवणाचे पदार्थ घरी असावेत, वर्षभर या पदार्थांचा वापर केला जातो. सणासुदीला व घरी आलेल्या नातेवाईक व पाहुण्यांना या पदार्थांचा पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी तीळ टाकून तिळाची कुरडई बनवण्यात येते.

घरात वर्षभर लागणाऱ्या पापड, शेवया, वडे, वेफर्स, पापड्या, कुरडयां च्या निर्मितीसाठी महिलांची सध्या लगबग दिसत आहे. उन्हाळा संपण्यापूर्वी सर्व साहित्य तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे, परंतु अधुन मधून पडणाऱ्या अवकाळी पावसाने त्यात व्यत्यय येत आहे.

एकमेका साहय करू या भूमिकेत शेजारी पाजारी महिला एकत्र येत आहेत. चवीच्या रंगढंगानुसार गृहीणींची सुख दुख वाटत पदार्थ बनवले जातात, घरातील लहान थोर यासाठी मदत करतात. घराच्या अंगणात, छतावर पदार्थ वाळवले जातात.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही हाताने बनविलेल्या पदार्थांना गृहिणींची पसंती अधिक आहे. ग्रामीण भागात महिला बचत गटांमार्फत पापड, कुरडया, शेवया हे पदार्थ बनवून शहरात मॉल अथवा बाजार पेठेत विक्रीला पाठवले जातात,

बचत गटांनी तयारकेलेल्या वस्तुंना जास्त मागणी असते, हे पदार्थ तयार करण्यासाठी अलिकडे लहान मोठी यंत्रे उपलब्ध झाली आहेत. मात्र हाताने तयार केलेल्या घरगूती स्वादाच्या पापड्या, कुरड्या व शेवयांची चव यंत्राच्या सहाय्याने तयार झालेल्या साहित्याला येत नाही, परिणामी गृहिणी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या साहित्याला पसंती देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News