Land Information:- जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार किंवा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तर यामध्ये खूप सावधानता बाळगणे गरजेचे असते. व्यवहार पूर्ण होऊन तुमच्या नावावर खरेदीखत पासून फेरफार नोंद होईपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते नाहीतर फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते.
कारण बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात किंवा वाचण्यात येते की जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. किंवा एकच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विक्री केली जाते. फसवणूक झाल्यानंतर आपला पैसा तर वाया जातोच.
परंतु मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा जमीन किंवा प्लॉटची खरेदी विक्रीचा व्यवहार करणे अगोदर जर त्या जमिनीची संपूर्ण माहिती आपल्याला सहजपणे मिळू शकली तर किती चांगले होईल. हो आता अशाच प्रकारचे सुविधा राज्याच्या महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
महसूल विभागाच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट विकसित करण्यात आलेली असून या वेबसाईटवरून तुम्ही कुठल्याही जमिनी विषयीची सगळी माहिती सहजपणे प्राप्त करू शकता.
कोणाच्या नावावर किती जमीन आहे? अशा पद्धतीने मिळवा माहिती
याकरिता महसूल विभागाच्या माध्यमातून एक वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली असून या माध्यमातून तुम्ही जमिनीचा नकाशा, जमिनीचे पत्रक तसेच खरेदी खत वगैरे अशा सर्व कागदपत्रांच्या नोंदी या माध्यमातून तपासू शकतात. याकरिता तुम्हाला फक्त महसूल विभागाच्या या वेबसाईटवर जाऊन काही स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे. त्या स्टेप्स पुढीलप्रमाणे….
1- याकरिता सगळ्यात अगोदर राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2- त्यानंतर तुमच्या जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याचे नाव निवडावे.
3- त्यापुढे तुम्ही तुमच्या तालुका म्हणजेच तहसीलचे नाव देखील निवडणे गरजेचे आहे.
4- तसेच तुम्हाला ज्या गावच्या जमिनी विषयी माहिती करून घ्यायची आहे त्या गावाचे नाव त्यामध्ये नमूद करावे.
5- नंतर समोर दिसणाऱ्या पर्यायांमधून खातेधारकाच्या नावाने शोधा हा पर्याय निवडायचा आहे.
6- त्यानंतर जमीन मालकाचे नावाचे पहिले अक्षर टाकून शोधा या बटणावर क्लिक करायचे आहे.
7- त्यानंतर तुम्हाला जे नावाचा शोध घ्यायचा आहे त्या जमीन मालकाचे नाव निवडायचे आहे.
8- त्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे.
9- कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला संबंधित खातेदाराच्या जमिनीच्या खात्याचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दिसेल.
10- यामध्ये तुम्हाला त्या जमिनीचा खसरा म्हणजेच गट क्रमांक व यासह सर्व तपशील या ठिकाणी पाहायला मिळेल. खातेधारकाच्या नावावर किती जमीन आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही महसूल विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातून संबंधित जमिनीची संपूर्ण माहिती घेऊ शकता व होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता.