कोरोनाबाधितांची सेवा करणाऱ्या नगरी डॉक्टरच्या पाठीवर लतादीदींची कौतुकाची थाप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राज्यावर आलेल्या कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी अटक कोरोना योद्धा अहोरात्र झटत आहे. यातच नगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एक डॉक्टर सध्या मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्नांच्या सेवेत दाखल आहे.

त्यांच्या याच सेवेची दखल घेत त्यांच्या पाठीवर देशाची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी कौतुकाची थाप दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून वांद्रे-कुर्ला संकुलात २ हजार २०८ रूग्ण क्षमतेचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

या केंद्राचे प्रमुखपद अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील डॉ.राजेश डेरे यांच्याकडे आहे. दिवस-रात्र ते काम करीत आहेत. आतापर्यंत २२ हजार रूग्ण तेथे उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. जागतिक सर्वेक्षणात मुंबईमधील कोविड सेंटरचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर, सचिन पिळगावकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या कामाचे कौतुक केले आहे. लतादीदींनी डॉ. डेरे यांना पत्र पाठवत आपण करीत असलेल्या रूग्णसेवेला सलाम अशा शब्दांत त्यांचे आभार मानले आहेत.

डॉ. डेरे यांच्या कार्याचे बॉलीवूडमधील सेलिब्रेटी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे. दरम्यान डॉ. डेरे हे या कोविड सेंटरच्या प्रमुख पदाच्या माध्यमातून ही सर्व व्यवस्था चोखपणे सांभाळत आहेत.

डॉ. डेरे हे मुंबई मधील सात हजार रूग्ण क्षमतेच्या सात जम्बो कोविड सेंटरमध्येही समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. शिर्डीमधील नव्याने होत आसलेले चार हजार रूग्ण क्षमतेचे कोविड सेंटरमध्येही डॉ.डेरे यांचाच अनुभव कामी येते आहे. तेथेही ते राज्य सरकारकडून समन्वयकाची भूमिका बजावत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe