अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
‘माझी तब्येत अत्यंत ठीक आहे, चार दिवस उपचार केले. थोडा हृदयाचा त्रास होता. सगळ्यांच्या आशीर्वादाने, लिलावतीचे डॉक्टर, नर्सेस यांच्यामुळे मी आता बरा आहे.
दोन दिवस विश्रांती घेऊन कामाला लागेन. डॉक्टरांनी बरेच सल्ले दिले आहेत, त्यातले जे शक्य आहेत ते पाळत राहू.’ अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी डिस्चार्जनंतर माध्यमांना दिली.
तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना राऊत म्हणाले, ‘मी भाजपच्या दुःखात सहभागी आहे, आम्हाला नक्की आनंद आहे. अशी हार जीत होत असते.
पण भारतीय जनता पक्षाचे पदवीधर मतदार संघाचे बालेकिल्ले ढासळले. यांचा विचार जर केला, तर महाराष्ट्रातले वारे हे समाजातल्या सर्व स्तरात बदलताना दिसत आहे. महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा नाही, असं म्हणणाऱ्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल दाखवून दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved