येत्या दोन ते तीन दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचं संभाव्य खातेवाटप समोर आलेलं आहे.
त्यामुळे या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात नेमक्या कुणाचा समावेश असेल, याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे
जयंत पाटील
नवाब मलिक
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
मकरंद पाटील
राजेश टोपे
शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी :
एकनाथ शिंदे
सुभाष देसाई
रामदास कदम
सुनील प्रभू
अनिल परब
उदय सामंत
दीपक केसरकर
तानाजी सावंत
गुलाबराव पाटील
संजय राठोड
काँग्रेसच्या संभाव्य नेत्यांची नावे
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
विजय वडेट्टीवार
के सी पाडवी
विश्वजीत कदम
यशोमती ठाकूर
सतेज बंटी पाटील
सुनिल केदार
कोणत्या पक्षाला कोणत मंत्रीपद ?
गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता (राष्ट्रवादी)
महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता (काँग्रेस)
नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता (शिवसेना)
ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात
दरम्यान नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही एकूण 15 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आणखी काही नावांबाबत खलबतं सुरू असल्याची माहिती आहे,विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे.