नवऱ्याला सोडले, प्रियकराला गाठले;पुढे झाले असे…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-येथील एक विवाहित स्त्री अविवाहित युवकाच्या प्रेमात पडली अन्‌ घरदार सोडून त्याच्यासोबत निघून गेली. तर दोघे आठ वर्षे एकत्र राहिले परंतु आता त्यानेही तिला हाकलून दिल्याने ती पोलिस ठाण्यात पोहोचली.

परंतु, पोलिसांनीही तिला इकडून तिकडे चकरा मारायला लावल्याची घटना घडली आहे. याबाबत हकीगत अशी: लग्नानंतर शहरातच ती पतीसोबत राहत होती.

एक मुलगी झाली. त्यानंतर ती कापड दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या प्रेमात पडली अन प्रेमाच्या ओढीने ती राजापेठ येथून पतीला सोडून मुलीसोबत प्रियकराकडे आली.

अन्‌ लग्न न करता दाम्पत्याप्रमाणे ते राहू लागले. या काळात पतीनेही तिच्याकडे बघितले नाही. तिने पहिल्या पतीपासून घटस्फोटही घेतला नाही.

आठ वर्षे विवाहित प्रेयसीसोबत राहिलेला प्रियकर गेल्या काही दिवसांपासून तिला टाळत होता. लॉकडाउनच्या काळात तो जिल्ह्यातील दुसऱ्या गावी गेला. कुटुंबीयांनी त्याचे लग्न एका युवतीसोबत जुळविले.

ही विवाहित प्रेयसी शेजारी राहणाऱ्या दोन महिलांसह प्रियकराच्या घरी गेली, त्याला जाब विचारला असता, त्याने लग्नास नकार देऊन तिला हाकलून लावले.

तेथून तडक तिने राजापेठ पोलिस ठाणे गाठले. राजापेठ पोलिसांनी तिची तक्रार गांभीर्याने न घेता, घटनास्थळ फ्रेजरपुरा हद्दीत असल्याचे सांगून तिला फ्रेजरपुरा ठाण्यात जाण्यास भाग पाडले.

फ्रेजरपुरा पोलिसांनी ही घटना राजापेठ परिसरापासून सुरू झाल्याने तिला पुन्हा राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment