अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काही महिन्यांपूर्वी बुरुडगाव परिसरात बिबट्या आढळला होता. आता केडगाव, शास्त्रीनगर, पांजरापोळ भागात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे.
वन विभागाने या परिसराची पाहणी केली, परंतु बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगावातील नाला, अजय गॅस गोडाऊन, पांजरापोळ, रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण तयार झाले.
बिबट्या पाहिल्याचे काही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. त्यामुळे वनविभागाच्या पथकाकडून केडगाव परिसराची पाहणी केली जात आहे. केडगाव रेल्वे ट्रॅक परिसरातील शेत, केडगाव नाल्याच्या भाग वनाधिकाऱ्यांनी फिरून पाहिला, पण कोणत्याही प्रकारच्या बिबट्याच्या वास्तव्याच्या खुणा आढळून आल्या नाहीत.