अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटाने सर्वांना वेठीस धरले आहे. त्यामुळे या संकटात काळात काम करणाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही लोकांकडून टीकाही होत आहे.
परंतु आपण आपला संयम सोडू नये, असा सल्ला आमदार अरुण जगताप यांनी दिला. कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून आमदार जगताप यांनी सत्कार केला.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, स्वदीप खराडे, किसन बेदमुथा, सचिन भंडारी, चंदू औशिकर आदी उपस्थित होते.
स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांनी कोरोना संकटाच्या काळात बूथ हॉस्पिटलला मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश, साबण दिले, भिंगार येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी केली,
आनंदऋषिजी अपंग कल्याण केंद्र येथे मुलांना मास्क वाटप केले, ज्येष्ठांसाठी डेंटल कॅम्प घेतला. याची दखल घेत शिंदे यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सत्कार केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved