मुंबई :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
माझ्या वडीलांच्या इच्छेविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपात येण्याची ही भूमिका ही सुजय विखे पाटील याची वैयक्तिक भूमिका आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट आणि शिर्डी संस्थानचं उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
LIVE UDPATES
नगरमधील दोन्ही खासदार युतीचे असतील, असा शब्द देतो – सुजय विखे पाटील
माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय घ्यावा लागलाय, त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे – सुजय विखे पाटील
मोदींच्या प्रभावातून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला – सुजय विखे पाटील
मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील
भाजपकडून विरोधी पक्षनेत्याच्या घराला खिंडार, सुजय विखे अखेर भाजपच्या गोटात सामिल
काँग्रेसला जबर धक्का, विरोधी पक्षनेत्याची घरात खिंडार, सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश