लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; स्पर्धेत सहभागी होऊन मिळावा बक्षिसे !

Ahmednagarlive24
Published:

पुणे : सध्याच्या लॉकडाऊनमध्ये मोबाइलवर फ़क़्त गेम खेळणे व व्हिडिओ पाहणे याच्याही पल्याड जाऊन तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘वाचा, परीक्षा द्या आणि बक्षीस मिळवा’ ही स्पर्धा लोकरंग फाउंडेशन (बाबुर्डी बेंद, अहमदनगर) यांनी आयोजित केली आहे.

गुगल डॉक्सच्या मदतीने घरबसल्या अभ्यास आणि परीक्षा देण्याची सोय असल्याने राज्यातील पहिली ते पाचवी या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्षा माधुरी चोभे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. 20 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

पालक किंवा विद्यार्थ्यांनी यासाठी फ़क़्त https://forms.gle/AXiij2KtzBxtR55ZA या लिंकवर क्लिक करावी. त्यानंतर भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किंवा पालकांच्या (जो व्हाटस्अॅप नंबर अर्जात दिलेला असेल त्यामध्ये किंवा तुम्ही दिलेल्या इमेलवर) चार पुस्तके पीडीएफ स्वरूपात पाठविले जातील. त्याच चार पुस्तकांवर आधारित आणि काही जनरल नॉलेज प्रश्नांवर आधारित ही ऑनलाइन परीक्षा (गुगल डॉक्सच्याच मदतीने) दि. 13 ते 15 मे 2020 या कालावधीत घेण्यात येईल.

यामध्ये सहभाग घेण्यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही. परीक्षेत सर्वाधिक स्कोअर केलेल्या पंधरा विद्यार्थ्यांना बक्षीस आणि उत्तीर्ण झालेल्या सर्वांना पार्टीसिपेशन सर्टिफिकेट देण्यात येईल. लॉकडाऊन म्हणजे नवे काहीतरी करण्याची चालून आलेली संधी आहे.

याच टीव्हीवर माहितीपर कार्यक्रम पाहण्यासह विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी आणि स्वतःला घडविण्यासाठी पालकांनी या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समन्वयक डॉ. प्रफुल्ल गाडगे, प्रा. संदीप वाघ, सचिन चोभे, महादेव गवळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8275438173 / 9422462003 या मोबाइल नंबरवर किंवा [email protected] या इमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन लोकरंग फाउंडेशन यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment