अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे.
पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. लॉकडाउन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला असून,

file photo
आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत.
लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारने यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. मिशन बिगीन अगेन अंतर्गत गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला काही निर्बंध शिथील करण्यात आले होते.
यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. पण, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved