खा.सुजय विखेंसह आ.संग्राम जगताप यांनी केला ‘इतका’ खर्च…

Published on -

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे.

यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला असून

त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे.

शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे या दोघांचाही खर्च समान म्हणजे 59 लाख रुपये आहे.

23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागून नगर मतदारसंघातून भाजपचे डॉ. विखे, तर शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे खा. लोखंडे यांचा विजयी झाले.

निकालानंतर महिनाभरात अंतिम खर्च सादर करावा, अन्यथा निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द होते आणि जे पराभूत आहेत, त्यांनाही पुढे साडेपाच वर्षे निवडणूक लढवता येत नाही,

असे निवडणूक आयोगाने या उमेदवारांना कळवले होते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी 22 जूनपूर्वी अंतिम खर्च सादर केला.

MP Sujay Vikhe And MLA Sangram Jagtap File Photo

नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. विखे यांनी सर्वाधिक 64 लाख 49 हजार 332 एवढा खर्च झाल्याचे सांगितले असून त्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी 61 लाख 8 हजार 138 एवढा खर्च नोंदवला आहे.

अपक्ष उमेदवार संजीव भोर 6 लाख 90, कमल सावंत 4 लाख 41 हजार, भास्कर पाटोळे 1 लाख, आबिद शेख 1 लाख 40 हजार, ज्ञानदेव सुपेकर 1 लाख 15 हजार, नामदेव वाकळे 1 लाख 55 हजार, सुधाकर आव्हाड यांनी 3 लाख 53 हजार खर्च नोंदवला आहे.

File Photo

त्याच प्रमाणे शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी 59 लाख 79 हजार 132, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी 59 लाख 73 हजार 183 रूपये एवढा खर्च केला आहे.

अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2 लाख 81 हजार, बन्सी सातपुते यांनी 7 लाख 42 हजार, सुरेश जगधने 4 लाख 39 हजार, प्रकाश आहेर 2 लाख 93 हजार, संजय सुखदान 14 लाख 46 हजार, प्रदीप सरोदे यांनी 8 लाख 52 हजार खर्च नोंदवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News