अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- प्रेम करण्यासाठी विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला प्रेमासाठी धमकावत अंगावर अॅसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडली.
तालुक्यातील ढवळपुरी येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या गेटजवळ काल दुपारी १५ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वेळोवेळी पाठलाग करुन दुचाकी आडवी घालून माझे तुझ्यावर प्रेम आहे तू मला आवडतेस , असे म्हणत धरुन , ओढून चुंबन घेण्याचा प्रयत्न करुन , लज्जा उत्पन्न होईल , असे वर्तन करुन विनयभंग केला.
विद्यार्थिनीने विरोध करताच तोंडात चापटी मारुन जर तू माझी नाहीतर तुझ्या अंगावर अॅसिड टाकील, तुला उभी कापील, तु माझे वाटोळे केले तर मी तुझे वाटोळे करीन, अशी धमकी देवून शिवीगाळ केली.
धाडसी विद्यार्थिनीने थेट नातेवाईकांसह पारनेर पोलिसांत जावून फिर्याद दिल्यावरुन आरोपी अक्षय संजय कुटे , रा . कुटेवाडी , ढवळपुरी , ता . पारनेर याच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ , ३५४ ( ड ) ( २ ) ३४१ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ७ , ८ , ११ . ( ४ ) १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे.