औरंगाबाद : कोरोनामुळे जगभरातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी भारताला पसंती देण्यास सुरवात केली आहे.
याचा फायदा घेत राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने डीएमआयसीअंतर्गत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना सवलती असतील.

गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले. राज्याचा उद्योग विभाग अमेरिका, जर्मनी, जपान, तैवान येथील उद्योजकांशी बोलणी आणि वाटाघाटी करीत आहे.
त्यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. ते उद्योग जाऊ नयेत यासाठी सवलती देण्यात येणार आहेत. सर्व सुविधांसह ४० हजार हेक्टर जमीन राज्यात उपलब्ध आहे.
सध्या गुंंतवणूकदारांचे नाव जाहीर करणे योग्य नाही; परंतु परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येईल. राज्यात ६४ हजार, ४९३ पैकी ३४, ८२१ उद्योग सुरू झाले असून, ९ लाख, १७ हजार कामगार कामावर येत आहेत.
कामगारांची काळजी घ्यावी, असे आवाहनही देसाई यांनी केले.