अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : राज्यातील कोरोनासंबंधीची माहिती तसेच लॉकडाऊन संबंधी माहिती देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करत आहेत.
बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार,बोगस बियाणं विकणाऱ्यांना शिक्षा

अनेक ठिकाणांहून बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
आपल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यासोबत आपण राहिलं पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही
- 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण अत्यंत काळजीपूर्वक गोष्टी सुरू करत आहोत.
- 30 जून पर्यंत लॉकडाऊन आहे. पण हळूहळू आपण सर्व सुरू करत आहोत.
- जीव जगवणाऱ्या डॉक्टर आणि शेतकऱ्यांना माझं वंदन
- एक जुलै रोजी डॉक्टर दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन
- निसर्ग वादळाने ज्यांचं नुकसान झालं त्यासर्वांच्या पाठीशी सरकार
- आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे.
- निसर्ग चक्रिवादळात मनुष्यहानी कमीत कमी करण्यात यश
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews