महाराष्ट्रात आहे प्रवासासाठी देशातील सर्वात महागडा महामार्ग! 1 किलोमीटरला येतो तब्बल ‘इतका’ खर्च, वाचा माहिती

Ajay Patil
Published:

भारतात आणि महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची महामार्गे आहेत व आतापर्यंत नवीन महामार्गांचे काम वेगात सुरू आहे. महामार्ग हे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात  व देशातील महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यामागे देखील महामार्गांची महत्त्वाची भूमिका असते.

अशा महामार्गांवरून जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल स्वरूपामध्ये कर भरणे खूप गरजेचे असते. टोल हा महत्त्वाचा असून रस्ते वाहतुकीमधील ज्या काही पायाभूत सेवा सुविधा आहेत त्यांची देखभाल व उभारणी करिता हा टोल घेतला जात असतो.

देशातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक महामार्गावर या टोल टॅक्सचा दर हा वेगवेगळा आहे. या टोल टॅक्सच्या संदर्भात जर आपण देशातील सर्वात महागडा द्रुतगती महामार्ग बघितला तर तो महाराष्ट्रात असून  यावर एक रुपयापेक्षा जास्तीची रक्कम टोल करिता आपल्याला भरणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे या महामार्गाचे काम 22 वर्षांपूर्वी पूर्ण झालेले आहे व हा देशातील सर्वात जुना महामार्ग देखील समजला जातो. हा महामार्ग दुसरा तिसरा कोणता नाहीतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आहे.

वर्ष 2002 मध्ये तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये या द्रुतगति महामार्गाचे काम पूर्ण झाले व हा मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

 कसा आहे मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग?

साधारणपणे हा महामार्ग बांधण्याकरिता 16.3 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे व याची लांबी फक्त 94.5 किलोमीटर इतकी आहे. हा महामार्ग मुंबईतील कळंबोली या ठिकाणाहून सुरू होतो व पुण्यातील किवळे या ठिकाणी संपतो. विशेष म्हणजे या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाही तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केलेले आहे.

याअगोदर मुंबई ते पुणे प्रवास करायचा असेल तर तीन तासांचा कालावधी लागायचा. परंतु आता या महामार्गामुळे मुंबई ते पुणे या दरम्यानचे अंतर पार करण्यासाठी फक्त एक तासाचा कालावधी लागतो.

त्यामुळे मुंबई व पुणे या दोन शहरांमधील प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. तसेच हा महामार्ग निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असून  सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून हा महामार्ग जातो व यावर अनेक बोगदे आणि अंडरपास देखील उभारण्यात आलेले आहेत.

 किती लागतो या महामार्गावर टोल?

सध्या जर मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोल टॅक्स बघितला तर तो कार साठी 336 रुपये इतका आहे. यानुसार बघितले तर प्रत्येक किलोमीटर 3.40 रुपये टोल यावर भरावा लागतो.

या तुलनेमध्ये जर आपण देशातील इतर महामार्गांचे सरासरी टोल दर पाहिले तर ते सुमारे 2.40 रुपये प्रति किलोमीटर आहेत. त्यामुळे आपल्याला दिसून येते की या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्येक किलोमीटर करिता एक रुपयापेक्षा जास्तीचे खर्च येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe