महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर : बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं असल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे.

आरोपी संतोष मोहिते याने घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं आहे. तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये पीडित महिला 95 टक्के भाजली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, 50 वर्षीय पीडित महिला यामध्ये गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान या घटनेत पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. 

तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

आरोपी गावात राहणारा आहे. संतोष मोहिते असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी संतोष मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment